Pages

गोवळकोट



गोवळकोट किल्ला – चिपळूण
 
 गोवळकोट किल्ला , हा किल्ला जंजिर्याच्या हब्शांनी बांधला होता.तो महाराजांनी १६७० साली जिंकून घेतला.ह्या किल्ल्याचा परिसर २ एकरामध्ये पसरलेला आहे.ह्या किल्ल्यात रेड्जाई देवीचे मंदिर आहे.हा किल्ला एका छोट्या बेटावर आहे,चिपळूण पासून त्याचे अंतर १० कि.मी आहे.गोवळकोट किल्याला वशिष्टी नदीने घेरला आहे.वशिष्टी नदी ..भारतातील महाराष्ट्र कोंकण किनारा वरील लांबीने मोठी असलेली एक नदी.. आहे.गोवळकोट किल्याचा मालकी हक्क चौगुले घराण्याकडे होता.या किल्ल्यावर पुरातन काळातील तोफा व पाण्याचा मोठा हौद आहे. किल्ल्यावर रेडजाई देवीचे मंदिर आहे. मात्र किल्ल्याची दुरवस्था झाल्यामुळे पर्यटकांनीही किल्ल्याकडे पाठ फिरवली आहे.छत्रपती शिवाजी महाराजांनी आदिलशहाशी लढाई करून हा किल्ला ताब्यात घेतला. पुढे छत्रपती संभाजी महाराजांच्या निधनानंतर हा किल्ला मुरूड-जंजि-याचा सिद्दीने इ. स. 1689 मध्ये ताब्यात घेतला.

 त्यानंतर हा किल्ला ताब्यात घेण्यासाठी मराठय़ांनी सिद्दीशी अनेक वेळा लढाया करूनही हा किल्ला त्यांना जिंकता आला नाही. पुढे कान्होजी आंग्रे यांचे पुत्र तुळाजी आंग्रे यांनी 1744 मध्ये सिद्दीचा पराभव करून हा किल्ला पुन्हा स्वराज्यात आणला आणि या गडाला गोविंदगडअसे नाव दिले.हा किल्ला जमिनीवरील सुमारे दोन एकर क्षेत्रात विस्तारलेला आहे. सुमारे 342 पाय-या चढून किल्ल्यावर जाता येते. संपूर्ण गड माथ्यासभोवती तटबंदी असून माती, दगड, गुळ, चुना आदी साहित्याचा या किल्ल्याच्या बांधकामासाठी वापर केला गेला आहे. गडाला एकूण 12 बुरूज आहेत. आज चार बुरूज सुस्थितीत आहेत. किल्ल्याच्या मध्यवर्ती भागात 48 फुट लांब, 44 फुट रुंद व 22 फुट खोल आकाराचा विशाल हौद आहे. किल्ल्याच्या बुरूजावर पाच हौद आहेत. गडाला पूर्वेकडून व उत्तरेकडून दोन दरवाजे आहेत. दक्षिणेकडील तटबंदी लगत श्रीदेवी रेडजाईचे मंदिर आहे. ही मूर्ती इ. स. 1690 पूर्वीची आहे. गडाच्या चहूबाजूंनी वाहणा-या वशिष्ठी नदी व गोवळकोट खाडी परिसरातील बेटसमूहांमुळे पर्यटकांना हा किल्ला आकर्षित करतो

No comments:

Post a Comment

जिवाशी

जिवाशी जिवाशी ट्रेकर्सचे संचालक डॉक्टर निंबाळकर यांच्यामुळेच  हा लेखन प्रपंच  ………।