Pages

रत्नदुर्ग



 रत्नदुर्ग किल्ला
 रत्नागिरीचा किल्ला रत्नदुर्ग , रत्नगड किंव्हा भगवतीचा असेही म्हणतात.घोड्याच्या नाल्या सारखा या किल्याचा आकार आहे.अंदाजे १३०० मीटर लांब आणि १००० मीटर रुंदीचा हा किल्ला आहे.किल्यावर भगवती देवीचे मंदिर आहे.समुद्राच्या पातळीत या कड्यात एक गुहा आहे. नाल्याच्या आकाराच्या मध्यभागी दीपगृह उभारलेले आहे. या दिपगृहामुळे १५ कि. मी. परिसरातील बोटींना मार्गदर्शन मिळते.

 या किल्याची उभारणी बहमनी काळात झाली.नंतर हा किल्ला आदिलशहाकडे गेला.सन १६७० च्या सुमारास याचा अधिपत्य छत्रपती शिवाजी महाराजांकडे आले.१७१०-१७५५ या काळात हा किल्ला आंग्रे यांच्या ताब्यात होता.त्यानंतर १८१० तो पेशव्यांच्या ताब्यात होता.सदाशिवराव भाऊंच्या तोतयाला नाना फडणीसांनी याच किल्यात डांबून ठेवले होते. १८५७ च्या उठावापुर्वी झाशीची राणी किल्यावरील देवीच्या दर्शनासाठी येऊन गेली असल्याचे सांगण्यात येते.

 कसे पोहोचावे :
 रत्नगिरी बसथांब्या पासून रत्नदुर्ग किल्ला ४ कि. मी. वर आहे.

No comments:

Post a Comment

जिवाशी

जिवाशी जिवाशी ट्रेकर्सचे संचालक डॉक्टर निंबाळकर यांच्यामुळेच  हा लेखन प्रपंच  ………।