धाकोबा किल्ला
किल्ल्याचा प्रकार: गिरीदुर्ग
किल्ल्याची ऊंची: ४१०० मीटर
डोंगररांग:
भीमाशंकर
श्रेणी:
मध्यम
जिल्हा:
पुणे

नाणेघाट
आणि जीवधनच्या दक्षिणेकडे एक उत्तुंग पर्वत रांग दिसून येते. उत्तुंग खड्या कातळ
भिंती आणि कोकणात कोसळणारे एकाहून एक बेलाग कडे, अप्रतिम जंगल यांनी ही रांग सजलेली आहे. या डोंगर रांगेत कळसूबाई
(५२०० फूट) , कुलंग (४८०० फूट), रतनगड (४२०० फूट), आजोबा पर्वत (४६०० फूट) ,हरिश्चंद्रगड (४७००फूट) , जीवधन (३८०० फूट ), दुर्गा किल्ला (३९०० फूट), सिध्दगड (३२०० फूट), नानाचा अंगठा अशी एकाहून एक ऊंच शिखर /
किल्ले आहेत. नाणेघाट, दर्या घाट, साकुर्डी घाट, सादडे घाट, अहुपे घाट, माळशेज घाट इत्यादी घाट वाटा या
डोंगररांगेत आहेत. याच रांगेतील एका डोंगरावर धाकोबा किल्ला आहे. धाकोबाच्या सरळ
रेषेत असणारा दुसरा किल्ला म्हणजे ‘दुर्ग’. दुर्गमता आणि विरळवस्ती हे या भागाचे
वैशिष्ट्य आहे. येथे ग्रामस्थांची आपल्या प्राथमिक गरजा भागवतांनाच मारामार होते, तर वीज, शिक्षण तर दूरच राहीले. येथील मुख्य व्यवसाय शेती तर काही ठिकाणी
दुधाचा व्यवसाय पणा केला जातो.
इतिहास:
कल्याण
बंदरात उतरणारा माल मुरबाड,
वैशाखरे मार्गे विविध घाट मार्गांनी
सह्याद्रीची रांग ओलांडून घाट माथ्यावरील बाजारपेठेत जात असे. या घाट मार्गांवर
नजर ठेवण्यासाठी प्राचिन काळापासून अनेक किल्ले बांधण्यात आले. या किल्ल्यांचा
मुख्य उद्देश म्हणजे या व्यापारी मार्गांचे रक्षण करणे, त्यावर नजर ठेवणे. धाकोबा किल्ल्याचा उपयोग
ही टेहळ्णीसाठी होत असावा.
पहाण्याची ठिकाणे:
धाकोबा
गडावर गड किंवा किल्ला असण्याचे कोणतेही अवशेष नाहीत. धाकोबा किल्ल्यावरून नाणेघाट, जीवधनची मागची बाजू, दर्याघाट आणि कोकणचे विहंगम दृश्य
दिसते.
पोहोचण्याच्या वाटा:
१)
जुन्नर-आपटाळे मार्गे आंबोली गावात यावे. गावा बाहेरील गणपती मंदिरा मागुन एक वाट
दर्या घाटाकडे जाते. या वाटेने थोडे चालल्यावर डावीकडे जाणारा फाटा फुटतो. या
वाटेने दर्या घाटा उजवीकडे ठेवून चालत राहील्यास थोड्याच वेळात एक गुहा दिसते.
पुढे ढाकेश्वराच मंदिर आहे. इथुन दुर्ग किल्ल्याच्या पायथ्याशी असलेल्या
दुर्गेच्या मंदिरात पोहोचायला साधारणतः २ तास लागतात. येथुन गड माथा गाठ्ण्यासाठी
अवघड पायवाटेने वर चढावे लागते.दुर्गादेवीच्या मंदिरासून किल्ल्यावर पोहण्यास २०
मिनिटे लागतात. दुर्ग किल्ल्यावरुन पायवाटेने धाकोबा गडावर जाण्यास साधारणतः २ तास
लागतात.
राहाण्याची सोय:
धाकोबाच्या
पायथ्याशी असणार्या मंदिरात १५ जणांची राहण्याची सोय होते.
जेवणाची सोय:
गडावर
जेवणाची सोय नाही, आपण स्वत: करावी.
पाण्याची सोय:
दुर्गादेवीच्या मंदिराच्या बाजूलाच पिण्याच्या
पाण्याची तळी आहेत.
सूचना:
धाकोबा
आणि दुर्ग हे किल्ले एकत्रच पाहीले जातात.
No comments:
Post a Comment