Pages

सुवर्णदुर्ग



सुवर्णदुर्ग
 हणेर् बंदरातील सुवर्णदुर्ग म्हणजे किनारपट्टीलगतचं कोकणी निसर्ग सौंदर्याची खाणच जणू!महाराष्ट्राच्या किनारपट्टीलगत असलेले गडकिल्ले आजही स्वराज्याचं रक्षण करत आहेत. ऐन सागराच्या कुशीत दर्यावर राखण करत आजही ताठ मानेने हे जलदुर्ग उभे आहेत. त्या गडांवर माजलेलं जंगल आणि झुडपं तुडवत हा झाकलेला इतिहास शोधत काढावा लागतो. ह्मा जलदुर्गांची राखण करणाऱ्या तोफांची आजची अवस्था पाहून मन दुखावतं. स्वराज्याचं रक्षण करणाऱ्या अशा या पहारेकऱ्यांकडे पर्यटकांनीच पाठ फिरवल्यासारखं वाटतं. असाच दर्यात ताठ मानेने आजही उभा असणारा आणि स्वराज्याचं रक्षण करणारा गड म्हणजे 'सुवर्णदुर्ग'.मुंबई गोवा महामार्गावर असणाऱ्या खेड फाट्यावरुन दापोली गाठायचं. पुढे दापोलीहून हणेर् बंदराकडे जाण्यासाठी बससेवा उपलब्ध आहे. हणेर् बस स्थानकावर पायउतार झालं, की साधारण १०-१५ मिनिटांत हणेर् बंदर गाठता येतं. ऐन सागराच्या कुशीत वसलेल्या या जलदुर्गावर आज पिण्याचं पाणी उपलब्ध नसल्याने सोबत पाणी घेऊन जावं. बंदरावर अनेक होड ्या डौलात नांगर टाकून उभ्या असतात.

 नितळ सागरकिनाऱ्यालगत डौलत असणाऱ्या होड्या, नारळपोफळीची झाडं आणि किनाऱ्यावर येणारी ताजी मच्छी हे दृश्य पाहण्यासारखं असतं.बंदरावरुन किल्ल्यात जाण्यासाठी स्थानिक मच्छीमार संघटनेने छोटे पाडाव ठेवले आहेत. होडीतून सुवर्णदुर्गावर जाण्यासाठी साधारण २० मिनिटं लागतात. होडीतून जाऊन येण्यासाठी माणशी ६०-७० रुपये आकारले जातात. सुवर्णदुर्गावर उतरण्यासाठी धक्का नसल्याने सुवर्णदुर्गाच्या किनाऱ्यावर असणाऱ्या शुभ्र वाळू आणि गुडघाभर पाण्यात उतरावं लागतं. ही शुभ्र वाळू तुडवत किल्ल्याच्या प्रवेशद्वाराजवळ पोहोचायचं. प्रवेशद्वाराबाहेर झुडपं वाढल्याने बऱ्याचदा प्रवेशद्वार दिसत नाही. याच झुडपात आपल्याला तोफा गंजत पडलेल्या दिसतात. दुर्गाचं प्रवेशद्वार पूर्व दिशेला असून उत्तराभिमुख आहे. हे प्रशस्त प्रवेशद्वार शिवनिमिर्त आहे.महाद्वाराजवळ पोहोचताच पायरीवर कोरलेलं कासवाचं शिल्प नजरेस पडतं, तर उजव्या बाजूला तटबंदीवर हनुमानाची मूतीर् कोरलेली आहे. ही मूतीर् शिवकाळानंतर निर्माण केलेली आहे. प्रवेशद्वारातून आत शिरताच दोन पहारेकऱ्यांच्या देवड्या दिसतात. या देवड्यांच्या दोन्ही बाजूने तटबंदीवर जाण्यासाठी दगडी पायऱ्या आहेत. गडावर झुडुपं माजल्याने जरा जपूनच फिरावं लागतं. डाव्या हाताने पुढे गेल्यावर बांधीव विहीर आणि पुढे राजवाड्याचे दगडी चौथरे पाहायला मिळतात. तर किल्ल्याच्या दक्षिणेकडे भक्कम बांधणीचं कोठार आहे. सुवर्णदुर्गाच्या भक्कम तटबंदीवरुन हिरवं पाणी असलेल्या विहिरी आणि पडझड झालेले वाड्याचे अवशेष पाहायला मिळतात. इथेच दोन झाडांवर कावळ्यांची घरटी आहेत.दुर्गाच्या पश्चिम तटाकडे एक सुरेख चोरदरवाजा आजही सुस्थितीत असलेला दिसतो. या दरवाज्याने थोडं खाली उतरलात की दहा फूट खोल किल्ल्याचा पायथा उरतो. तिथे खोबणीत घुबडं पाहायला मिळतात. गडावर सात विहिरी आहेत, पण कुठेही मंदीर नाही. याचा संदर्भ इतिहासता शोधल्यावर कळतं, की दर्याराज कान्होजी आंग्रे म्हणजे म्हणजे समुदावरचा शिवाजी यांची कुलदैवता कालंबिका देवी इतिहासकाळात सुवर्णदुर्गावरुन हलवून अलिबागच्या हिराकोटामध्ये प्रस्थापित केली होती. इ.स. १६६० मध्ये महाराजांनी हा किल्ला आदिलशहाकडून जिंकून घेतला आणि किल्ल्याच्या डागडुजी आणि पुर्नरचनेसाठी दहा हजार दोन रुपये खर्च केले.

2 comments:

जिवाशी

जिवाशी जिवाशी ट्रेकर्सचे संचालक डॉक्टर निंबाळकर यांच्यामुळेच  हा लेखन प्रपंच  ………।