नाशिक जिल्ह्यामध्ये सटाणा तालुका आहे. हा भाग
पुर्वी बागलाण म्हणून ओळखला जात असे. आजही अनेकदा याचा उल्लेख बागलाण असा केला
जातो.सटाणा या तालुक्याच्या गावापासून ईशान्येकडे नामपूर हे गाव आहे. या
नामपूरच्या वाटेवर कर्हे नावाचे लहानसे गाव आहे. या गावाजवळच कर्हेगडाचा किल्ला
आहे. हा किल्ला स्थानिक लोकांना अपरिचित आहे. स्थानिक लोक याला भवानीचा डोंगर
म्हणून ओळखतात. कागदपत्रांमधील माहीतीच्या आधारे १९८७ साली घेतलेल्या एका शोध
मोहीमेमध्ये कर्हेगडाचे स्थान निश्चित करण्यात यश मिळाले. याच मोहीमे दरम्यान या
भागातील दुंधागड तसेच अजमेर हे सुद्धा किल्ले असल्याचे आढळले.सटाणाहून मुलाणे
मार्गे दोधेश्वर येथील मंदिराजवळ पोहोचता येते. सटाणापासून १२ ते १३ कि. मी.
अंतरावर दोधेश्वराचे मंदिर डोंगराच्या सानिध्यात उभे आहे. या निसर्गरम्य परिसराचे
अवलोकन करुन आपण कर्हेगडाच्या पायथ्याजवळ पोहोचतो. हे अंतर दोन तीन कि. मी. आहे.
कर्हेगडाच्या उत्तरेकडे उतरलेल्या डोंगरदांड्यावरूनच किल्ल्यावर जाण्याचा मर्ग
आहे. सोबत पाणी घेवून चढणे सोयीचे आहे.कर्हेगडाच्या माथ्याखाली कातळामध्ये
खोदलेल्या काही पाय-या लागतात. यावरुन आपण माथ्यावर दाखल होतो. कर्हेगडाचा माथा
लहानसा आहे. माथ्यावर घरांच्या जोत्याचे अवशेष आढळतात. कातळात कोरलेली पाण्याची
टाकी आहेत. या टाक्यामध्ये शेवाळे वाढलेले असते. काही वेळेस ती कोरडीही पडलेली
असतात. माथ्याच्या पश्चिम अंगाला कातळात गुहा आहेत. कर्हेगडाच्या माथ्यावरुन
साल्हेर, सालोटा, मुल्हेर, मोरागड, रतनगड, तांबोळ्या, मांगी -तुंगीचे
सुळके, सिष्ठा, देरमाळ, पिसोळ, अजमेर तसेच दुंधागड
दिसतात. स्वच्छ हवेत अंजळा-सातमाळा रांगेचेही येथून दर्शन होते.कर्हेगडाच्या
पायथ्यापासून देवळाणे हे गाव सात-आठ कि.मी. अंतरावर आहे. देवळाणे गावामध्ये
प्राचीन असे शिवमंदिर आहे. या शिवमंदिरावर काही शिल्पे प्रेक्षणीय आहेत.
कर्हेगडाच्या भटकंतीमध्ये या शिवमंदिराला आवर्जुन भेट देण्यास हरकत नाही.
Pages
- Home
- किल्ला तुगं
- Genaral
- चाकणचा किल्ला
- धाकोबा
- घनगड
- हडसर
- जीवधन
- शिवनेरी
- लोहगड
- नाणेघाट किल्ला
- निमगिरी
- पुरंदर
- रायरेश्वर
- रोहीडा
- सिंहगड
- तोरणा
- तिकोना
- उंबरखिंड
- विसापूर
- भुदरगड
- गगनगड
- गंधर्वगड
- कलानिधीगड
- महिपालगड
- मुडागड
- पन्हाळा
- पारगड
- रांगणा
- सामानगड
- विशाळगड
- गाविलगड
- नरनाळा
- अंतुर
- भांगसी गड
- देवगिरी
- जंजाळा
- लहुगड
- वेताळवाडी गड
- धर्मापूरीगड
- किल्ले धारूर
- किल्ले बेळगाव
- भामेर
- लळिंग
- रायकोट
- थाळनेर
- किल्ले तैलबैला
- किल्ले लोंझा
- किल्ले पेडका
- अवचितगड
- अटकेचा किल्ला
- कर्हेगड
- कासा किल्ला
- रतनगड
- राजमाची
- रामशेज
- वसंतगड
- सज्जनगड
- कुर्डूगड
- राजगड
- अजिंक्यतारा
- गोवळकोट
- प्रबळगड
- नळदुर्ग
- सुधागड
- बेलापूर किल्ला
- भरतगड
- मढ़चा किल्ला
- घोसाळगड
- कोरीगड
- मल्हारगड
- इंदुरीकिल्ला
- सुतोंडा
- सुवर्णदुर्ग
- रत्नदुर्ग
No comments:
Post a Comment